CEO Message

HomeCEO Message

CEO Message

आपला स्नेहांकीत,

ॲड. रविंद्र आर. कानडे

व्यवस्थापकीय संचालक, श्री मंगलनाथ मल्टीस्टेट

B.Sc.,B.Ed.,GDC&A,L.L.B.,L.L.M.,M.B.A.

 

प्रिय सभासद,

समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपल्या छोट्या मोठ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी हक्काची पतसंस्था असावी म्हणून माजलगाव तालूक्यातील पहिलीच अशी श्री मंगलनाथ समूहाची २३ वर्षापूर्वी फक्त २००००/- भाग भांडवलावर स्थापना करण्यात आली पैश्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वाससावर पैसा ठेवावा असे असे आवाहन सभासदांना करत जमा झालेल्या ठेवी मधून विशेष करून ग्रामिण भागातील व्यावसायिकांना कर्ज देण्याचे व शेतकऱ्यांना सावकारी पशातून मुक्त करण्याचे उदात्त कार्य संस्थेद्वारे करण्यात आले.

विना संस्कार नाही सहकार विना सहकार नाही उद्धार ही भावना सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या मनात रूजवून मंगलनाथ म्हणजे सहकाराचे एक संस्कारक्षम प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आले त्याचाच प्रत्यय म्हणजे माजलगांव तालुक्यातील सहकार वृद्धिगत झाला असून आज भारतात सर्वात जास्त सहकारी संस्था माजलगांव तालूक्यात आहेत माजलगावातील पहिली संस्था म्हणजे मंगलनाथ याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. २०००० रूपये भाग भांडवल घेवून सूरू झालेल्या संस्थेचे आज रोजी ६५० कोटी पेक्षा अधिक व्यवसाय असून १४ शाखांच्या माध्यमातून १००० कोटी व्यवसायाकडे संस्थेची दमदार वाटचाल सुरू आहे. या सर्व प्रवासात आज पर्यत आपल्या सारख्या सभासदांची मोलाची साथ लाभली आहे. सहकारांमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आज पर्यत संस्थेने राबवले आहेत असे म्हणतात की,

असफलता एक चूनौती है स्वीकार करो,

क्या कमी रह गये देखो और सूधार करो

जब तक ना सफल हो निंद चैन सब त्यागो तूम,

संघर्ष का मैदान छोड मत भागो तूम,

कुछ किये बिना ही जय जयकार नही होती,

कोशीश करणे वालो की हार नही होती…

हे कायम लक्षात ठेवत सातत्याने वेगवेगळे प्रयोगात सातत्य ठेवत संस्थेने प्रयत्न केले आहेत यामूळे बचत गटाची सशक्त अशी चळवळ आज माजलगांव तालूक्यात सूरू आहे. सहकारातून समृद्धीकडे हा मूलमंत्र घेत संस्थेची वाटचाल सूरू आहे आज पर्यंतच्या प्रवासात आपली मोलाची साथ लाभली आहे. या पूढील काळात १००० कोटींच्या व्यवसायाकडे संस्था जात असून या प्रवासात देखील आपली सक्षम साथ असेल हीच अपेक्षा…

जय मंगलनाथ ! जय सहकार !!

error: Content is protected !!