Chairman Message

HomeChairman Message

Chairman Message

आपला स्नेहांकीत,

आर. जी. कानडे

संस्थापक अध्यक्ष, श्री मंगलनाथ मल्टीस्टेट

शासकीय निवृत्त लेखापरिक्षक, सहकार खाते

२३ वर्षापूर्वी संस्थेची स्थापना काही निवडक मित्रांसोबत २०,००० रुपयांच्या भांडवलावर केली…आज सहकारी, मित्र, नागरीक व हितचिंतकाच्या बळावर आज २३ वर्षापूर्वी लावण्यात आलेले छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले असून संस्थेच्या प्रगतीस सर्वांचे योगदान आहे.

पतसंस्थेच्या माध्यमातून काम करत असतांना अनेकांशी ऋणानुबंधाचे संबंध निर्माण झाले आहेत. ग्रामिण जनतेची व गरीब लोकांची कामे केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहुन धन्यता वाटते.

या छोट्या पतसंस्थेच्या माध्यमातून २३ व्या वर्षाच्या वाटचालीस सर्व समाज घटकांशी जोडलो गेलो आहोत याचे समाधान आहे. संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीस गुरूवर्य सभासद, खातेदार, पत्रकार, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, लोकनेते, व्यापारी, महिला, माता, भगिनी, हितचिंतक, संचालक, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी, समाजातील सामान्य नागरीक यांचे योगदान राहिले आहे.

खुप स्वप्ने आहेत, पूर्ण करण्याचे मजबूत निश्चिय आहे, स्वप्न आणि पूर्तता यामधले अंतर पार करुन ते स्वप्न साकारणार आहोत. घराघरात श्री मंगलनाथ मल्टीस्टेट नाव पोहचण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहोत. आपण श्री मंगलनाथ मल्टीस्टेटला सहकार्य करतच आहात असेच पुढेही करावे ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद..!

जय हिंद… जय सहकार…!

 

error: Content is protected !!